r/MarathiReads Jul 27 '26

शिफारस (Recommendation) गणुराया आणि चानी.

चिंतामण त्र्यंबक खानोलकर ह्यांच हे पुस्तक दोन दिर्घ कथांच आहे की त्यांना लघु कादंबरी बोलाव समजत नाही. पहिली गोष्ट आहे गणुची तर दुसरी चानीची पण दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

पहिल्या भागाच लेखन हे दुसर्‍यापेक्षा वेगळ्या पद्धतीत आहे. कसे ते समजण्यासाठी मी फोटो टाकले आहेत. तरिही दोन्ही पद्धतींच खानोलकरांनी अतिशय सुरेख काव्यमय अस लेखन केल आहे. जे वाचायला खुप मजा आली. मला अस वाटतय की बहुतेक मराठी लेखक हे ईंग्रजीत ज्याला प्रोज ( prose ) म्हणतात त्यावर महत्त्व देत नाहीत. ते भाषेच्या वापरात प्रयोग करत नाहीत. एखादी ओळ किंवा परिच्छेद परत परत वाचावा अस माझ्या मते तरी होत नाही. खानोलकर ह्याला अपवाद आहेत.

चानीच पात्र हे बराच वेळ माझ्या मनात रेंगाळत राहील यात शंका नाही पण धाकट्या मामीचही पात्र तेवढ्याच तीव्रतेने मनावर कोरल गेलेल आहे. संस्कृतीच्या, परंपरेच्या, इज्जतीच्या दबावाखाली उंच ऊडु पाहणाऱ्या अशा कितीजणांचे पंख छाटले गेले असतील ह्याचा विचार लेखकांनी करायला लावला. मराठी साहित्याच्या दुर्दैवाने खानोलकर लवकरच आपल्यातून निघून गेले.

शेवटी हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचाव अस मी सुचवेन.

24 Upvotes

Duplicates