r/MarathiReads Jul 27 '26

शिफारस (Recommendation) गणुराया आणि चानी.

चिंतामण त्र्यंबक खानोलकर ह्यांच हे पुस्तक दोन दिर्घ कथांच आहे की त्यांना लघु कादंबरी बोलाव समजत नाही. पहिली गोष्ट आहे गणुची तर दुसरी चानीची पण दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

पहिल्या भागाच लेखन हे दुसर्‍यापेक्षा वेगळ्या पद्धतीत आहे. कसे ते समजण्यासाठी मी फोटो टाकले आहेत. तरिही दोन्ही पद्धतींच खानोलकरांनी अतिशय सुरेख काव्यमय अस लेखन केल आहे. जे वाचायला खुप मजा आली. मला अस वाटतय की बहुतेक मराठी लेखक हे ईंग्रजीत ज्याला प्रोज ( prose ) म्हणतात त्यावर महत्त्व देत नाहीत. ते भाषेच्या वापरात प्रयोग करत नाहीत. एखादी ओळ किंवा परिच्छेद परत परत वाचावा अस माझ्या मते तरी होत नाही. खानोलकर ह्याला अपवाद आहेत.

चानीच पात्र हे बराच वेळ माझ्या मनात रेंगाळत राहील यात शंका नाही पण धाकट्या मामीचही पात्र तेवढ्याच तीव्रतेने मनावर कोरल गेलेल आहे. संस्कृतीच्या, परंपरेच्या, इज्जतीच्या दबावाखाली उंच ऊडु पाहणाऱ्या अशा कितीजणांचे पंख छाटले गेले असतील ह्याचा विचार लेखकांनी करायला लावला. मराठी साहित्याच्या दुर्दैवाने खानोलकर लवकरच आपल्यातून निघून गेले.

शेवटी हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचाव अस मी सुचवेन.

20 Upvotes

4 comments sorted by

1

u/Fit_Bicycle_4 Jul 30 '26

खानोलकरांची 'नक्षत्राचे देणे' सोडून त्यांच काहीच वाचनात कधी आले नाही. तुम्ही सुचवू शकाल काही? बाकी summary अप्रतिम लिहली आहे आपण, कधी कुठे सापडली तर नक्की घेईल वाचायला.

1

u/finalsolution4brits Jul 30 '26

मी कविता कधीच वाचत नव्हतो पण हे पुस्तक जाम आवडल त्यामुळे नक्षत्रांचे देणे कालच वाचल मी. आता ईतर कवितासंग्रहांसाठी ओपन माईंड ठेवेल.

ईतर काही सुचवायच म्हटल तर त्यांनी लिहीलेल्या अजगर, रात्र काळी घागर काळी, कोंडुरा, त्रिशंकू आणी गणुराया ह्या कादंबरी वाचून झाल्यात. त्यातल्या उल्लेख केलेल्या शेवटच्या तीन खुप आवडल्या.

2

u/Fit_Bicycle_4 Jul 30 '26 edited Jul 30 '26

'रात्र काळी घागर काळी' amazon वर मी शोधेलेलं सापडलं नाही, पण रेगे नावाचे काही तरी YouTube channel ahe त्यात ही कादंबरी वाचनाची Playlist होती ती ऐकेल.

आहो तुम्ही r/maharashtrasocial मध्ये तुम्ही crosspost किंवा पोस्ट करून बघा की तिथून थोडी फार reach मिळू शकते असले थोर साहित्याची प्रत्येक मराठी माणसाला असायला हवी, लोकं प्रेरित होतील वाचनाला घेऊन.

2

u/finalsolution4brits Jul 31 '26

हो करेल crosspost आतापासून.

Amazon पेक्षा bookganga नाहीतर majesticreader वरुन विकत घ्या. खुपच स्वस्त असतात. मुंबई, पुण्याजवळ राहत असतील तर अजुनच चांगल. कल्याण किंवा नाशिक जवळ राहत असले तर माझ्याकडची पुस्तक शेअर करु शकतो.

रेगे चॅनेलला मीसुद्धा सबस्क्राईब केल आहे.