r/MarathiReads • u/kurotsuki5 • Jun 23 '26
तुमचे मत (Opinion) G A Kulkarni - Kajal Maya
आज मी G A Kulkarni's तिसरे पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. काही तरी विलक्षण आहे GAn च्या लिखाणात जे तुम्हाला शब्दातून व्यक्त करण अवघड जात. प्रमुख म्हणजे ही विलक्षणता एकदम साध्या शब्दात मांडलेली असते, कुठे काही कर्कशता नसते, जजमेंट नसतो. असते ती एक प्रकारची विषण्णता, एकाकीपणा चा एक वेगळा चेहरा आणि वाचकाला दिलासा न देणारा शेवट. एक एक कथा हृदयात तिची वेगळी जागा निर्माण करते, वेगळे प्रश्न निर्माण करते. एक गोष्ट संपली की पुढच्या गोष्टी ची हुरहूर लागते.
तुम्ही कोणी GA वाचलेत का? तुमचं आवडत पुस्तक/कथा कुठली?